September 22, 2024

कन्नड तालुक्यातील नेवपूर मध्यम प्रकल्पाजवळ मृतदेह आढळला

0
Contact News Publisher

पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार

  • क्राईम टीम औरंगाबाद
  • प्रतिनिधी-सचिन कुशेर

कन्नड तालुक्यातील चिंचोली ते करंजखेडा रस्त्यावरील नेवपुर मध्यम प्रकल्पाचे जवळ एका ३० वर्षे वयोगटातील चेहऱ्यावर जखमा असलेल्या अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळ्याने परिसरात खळबळ उडाली असून याविषयी पोलिसांनी दिलेल्या आधिक माहितीनुसार नेवपूर मध्यम प्रकल्पा जवळ चेहऱ्यावर जखमा असलेल्या अज्ञात व्यक्तीचे प्रेत पडून असल्याची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण सोळुंके यांना मिळाली.त्यांनी तात्काळ पिशोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पिशोर पोलीस ठाण्याच्या सपोनि कोमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, सोपान डकले, लालचंद नागलोद व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटू शकली नाही.खुनाचा प्रकार,इतर दुसरीकडून प्रेत आणुन टाकले असण्याची शक्यता यामुळे ग्रामीण पोलीस अधिक्षक निमित गोयल, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिक्षक संतोष खेतमाळस, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबद्दल सूचना केल्या.
श्वान पथक व ठसे तज्ञ यांना ही पाचारण करण्यात आले होते परंतु श्वान जागेवरच घुटमळल्याने अज्ञात वाहनाने हे शव परिसरात आणून टाकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मंजूर है..! मंजूर है..! च्या यादीत 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला सदस्या.., काय घडलं?

सदरील इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे- रंग-गोरा,उंची 5.2 इंच, डोक्यावर केस काळे व पांढरे आहे. कमरेला लाल रंगाचा करदोडा, हनुवटीला मार लागल्याने टाके दिलेले, उजव्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. दाढी स्वच्छ केलेली मीशा बारीक कापलेल्या, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, खिशावर लिननचे स्टीकर, पांढऱ्या रंगाची बनियन,बिग बॉस कंपनीची निळ्या रंगाची अंडरवेअर, फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. पिशोर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
वरील नमूद वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटली नसून,कोणास ओळख पटल्यास पिशोर पोलिस ठाण्याशी संर्पक करावा असे आवाहन सपोनि कोमल शिंदे यांनी केले आहे वृत्त हाती येई पर्यंत मृताची ओळख पटलेली नव्हती.

वेरूळ घृष्णेश्वर मंदिरच्या मालकी हक्काबाबतचा दावा; राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे; सुनावणीप्रसंगी..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending