September 23, 2024

कोरोनाने लावला हर्सूल जेलमध्ये सुरुंग

0
Contact News Publisher

कडेकोट लॉक डाऊन असतानादेखील २९ कैद्यांना कोरण्याची लागण

  • औरंगाबाद/ अनिस देशमुख

हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील तब्बल २९ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार  शनिवारी(दि़६) उघडकीस आला आहे़या घटनेने इतर कैद्यांसह कारागृहातील कैद्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कैद्यांना तातडीने एका वस्तिगृहात हलविण्यात आले असून त्याच ठिकाणी कोविड १९ सेंटर स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे़ या शिवय कैद्याच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना याच वस्तिगृहाच्या अन्य खोल्यामध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे़ मोठ्या संख्येत कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृह प्रशासन हदरले आहे़राज्यात आर्थर रोड , सोलापूर, नागरपूर नंतर औरंगाबाद येथील हर्सूल ककारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील इतर कारागृहातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाºयासह कैद्यांची आता चाचणी केली जात आहे.
हर्सूल कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याला २१ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती़ या वृत्ताला पोलीस प्रशासनाने दुजोरा दिला होता़ मात्र,  कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी आमच्याकडे कोणताही कैदी हा कोरोना बाधित नसल्याचा दावा केला होता़ एकीकडे मनपा आरोग्य विभागच्या सूत्रांनी आमचा अहवाल योग्य असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते़ त्याच रुग्णामुळे २९ कैद्यांना कोरोना झाल्याचे बालल्या जात आहे़ बाधित रुग्णाला इतर कैद्यांसोबत ठेवल्याचा आरोपही जेल प्रशासनावर होत
सूत्रांचे म्हणने आहे की, हत्या प्रकरणातल्या एका आरोपीला २० मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याने आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते़ या वेळी त्याचा कोविड १९ विषणू चाचीनीसाठी स्वॉब घेण्यात आला होता़ या नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आले़ चाचणी घेतल्यानंतरही संशयित कैद्याला अलगीकरणात न ठेवता त्याला कैद्यांच्या बराकीमध्ये ठेवल्या गेले़ २१ मे रोजी या कैद्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ तरी कारागृह प्रशासनाने आमच्याकडे कोणताही कैदी हा बाधित नसल्याचा दावा केला़ तो दावा चुकीचा होता असा आरोप आता कारागृह प्रशासनावर होत आहे़

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending