मावसाळा ‘ॲग्रो प्रोड्युसर’ कंपनीला आमदार प्रशांत बंब यांची भेट
कृषी संजिवनी योजनेच्या अडचणींवर तोडगा काढणार
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील मावसाळा ‘ॲग्रो प्रोड्युसर’ कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेमार्फत कृषि औजार कंपनीत आमदार प्रशांत बंब यांनी पाहणी केली व सर्व औजारे चांगल्या दर्जेदार असल्याचे सांगितले व मार्गदर्शन करून नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेत अनुदान साठी येणाऱ्या अडचणी बाबत तोडगा काढणार असल्याचे सांगितले व लवकरच तालुक्यातील शेतकरी कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले
उपस्थित कंपनीचे अध्यक्ष अमोल गवळी सचिव नितीन वरकड व संचालक मंडळ कृषी सहाय्यक श्रीमती सोनाली पाटील ग्रामसेवक अदमवाड तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे अरीत फाऊंडेशन चे सी.ओ श्री अनिल घुगे आशिष कुलकर्णी गोपाल वर्मा रझ्झाक पठाण योगेश बारगळ सोमनाथ गोरे अतिष देवगिरीकर कारभारी वरकड ज्ञानेश्वर वरकड रामेश्वर वरकड किरण वरकड गणेश श्रीखंडे गावातील नागरिक उपस्थित होते.
खुलताबाद – घरकुल प्रपत्र ‘ड’ यादी सर्वेक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक; ३८ गावांचा समावेश
खुलताबाद – ३८ गावांतील घरकुल याद्या उपलब्ध; लाभार्थ्यांनो आजचं ‘हे’ काम करा..