IPL 2022 : आयपीएल संघात हे खेळाडू राहिले कायम!
जाणून घ्या कोणकोणत्या खेळाडूंचे आयपीएल संघ राहिले कायम!
- क्राईम टाईम्स डिजिटल टीम
आयपीएल २०२२ च्या लिलावात (IPL 2022 Auction) बऱ्याच वर्षानंतर भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. आधीच्या ८ फ्रँचाईजी संघांनी नव्याने संघबांधणी करताना काही खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आणि काहींना जवळ केले आहे. या बदलांमध्ये काही खेळाडू मात्र होते त्याच संघात कायम राहिले आहेत. आयपीएलच्या भाषेत ‘रिटेन’ (Retained Players) केल्या गेलेल्या या खेळाडूंमध्ये अपेक्षेप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जने माही अर्थात महेंद्रसिंग धोनी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहली, मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, किरोन पोलार्ड व जसप्रीत बुमरा, सनरायजर्स हैदराबादने केन विल्यमसन, कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेल, दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंत, राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन यांना संघात कायम राखले आहे.
हे खेळाडू रिटेन होतील हे अपेक्षितच होते पण वेंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, उमरान मलिक या खेळाडूंनाही रिटेन केले गेले हे काहीसे अनपेक्षित होते.
आयपीएल २०२२ साठी संघांनी रिटेन केलेले खेळाडू असे-
आरसीबी -विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज
केकेआर -वरुण चक्रवर्ती, सुनील नरीन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर
पंजाब किंग्ज -अर्शदीप सिंग, मयांक अगरवाल
सीएसके – महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा,ऋतुराज गायकवाड, मोईन अली
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, पृथ्वी शॉ, आन्रीच नॉर्ये, अक्षर पटेल
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव
एसआरएच – केन विल्यमसन, उमरान मलिक, अब्ंदुल मलिक