शालेय समितीच्या अध्यक्षपदी रमेश नलावडे तर उपाध्यक्षपदी नसीम पठाण

Contact News Publisher
- क्राईम टाईम्स टीम
- रामेश्वर नलावडे
बाजार सावंगी 🙁ता.26) खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्यध्यापिका दिवेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश नलावडे तर उपाध्यक्षपदी नसीम पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सद्स्यपदी सुभाष नलावडे, अनिता नलावडे, अर्चना नलावडे, शफिक सय्यद, लक्ष्मी नलावडे, भगवान राणे, मचिंद्र नलावडे, संतोष साबळे, सविता नलावडे, तारा गायकवाड, उषा पवार, मनोहर जाधव यांची निवड करण्यात आली याप्रसंगी गायकवाड सर, मगर सर, अणदूरे सरसह इतर शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.