प्रशासनाचा हलगर्जीपणा चवट्यावर; सरपंच सदस्यांसह ग्रामपंचायतच्या ‘छतावर’ उद्या उपोषण

खुलताबाद-खिर्डी ग्रामपंचायत इमारत कोसळण्याच्या मार्गावर
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद: सात वर्षांपूर्वी बांधलेल्या खिर्डी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीस निकृष्ठ बांधकामामुळे तडे गेले आहेत. यामुळे ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. जि.प. प्रशासनाकडे वर्षभरापासून पाठपुरावा करून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने सरपंच ज्ञानेश्वर मातकर व पदाधिकारी उद्या ग्रामपंचायतच्या छतावर उपोषणास बसणार आहेत. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार त्यांनी तालुका प्रशासनास केला आहे.
असून, इमारत बांधकामास १५ लाख ५० हजाराचा खर्च करण्यात आला. या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने भिंतींना व इतर ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत सरपंच ज्ञानेश्वर मातकर पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना इमारत कोसळण्याची तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे पत्र दिले आहे व नवीन इमारतीस मंजुरी देण्याची मागणी करण्यात केली आहे.
- खिर्डी ग्रा.पं. इमारतीचे बांधकाम सन २०१४-१५ या वर्षात करण्यात आले
- ग्रामपंचायतीनेही पारित केला ठराव
खिर्डी ग्रामपंचायतीच्या मार्च २०२१ च्या मासिक सभेत ग्रामपंचायतीची इमारत धोकादायक असून, निकृष्ठ बांधकामामुळे जीवितास धोका असल्याने नवीन इमारत मंजुरीचा ठराव संमत केला. नवीन इमारतीस मंजुरीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयास पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. वर्ष झाली तरी कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.