September 23, 2024
Contact News Publisher

खासगी कार्यलये आजपासून सुरू

जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल

१० टक्के  उपस्थितीची अट; जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल

मुंबई वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात दुकाने, रिक्षा-टॅक्सी किं वा अन्य व्यवहार सुरू झाल्यानंतर निर्बंध शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून खासगी कार्यालये सुरू होत आहेत. कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केल्याने सरकारी कार्यालयांमधील लगबग वाढणार आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास गती मिळणार आहे.

टाळेबंदीच्या पाचव्या पर्वात ‘पुन्हा सुरुवात’ या शीर्षकांतर्गत राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये विविध निर्बंध शिथिल करणार असल्याचे जाहीर के ले होते. यापैकी दोन टप्प्यांमध्ये व्यवहार सुरू झाले.

सोमवारपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, नागपूर, ठाणे, पुण्यासह १८ महापालिका हद्दीत खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकणार नाहीत. सध्या तरी एकू ण क्षमतेच्या दहा टक्के  किं वा १० कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहता येईल. अन्य कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे (वर्क  फ्रॉम होम) असे बंधन सरकारने ठेवले आहे. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये सोमवारपासून उपस्थिती वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी किं वा कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून किमान एक दिवस उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच अनुपस्थित राहिल्यास वेतनात कपात करण्यात येईल, असेही सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले. उपनगरी रेल्वे अद्यापही बंद असल्याने मंत्रालय किं वा मुंबईत पोहचण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. मंत्रालयातील बहुतांश कर्मचारी मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई ते अगदी पुण्यापर्यंत दररोज प्रवास करतात. कल्याण, बदलापूर, पनवेल आदी ठिकाणाहून एसटी व बेस्ट बसेस सोडण्यात येणार असल्या तरी कर्मचाऱ्यांना पोहचणे कठीणच जाईल. बसमध्ये मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱ्यांना सामावून घेणे शक्य होणार नाही. यामुळेच आधी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी सरकारी कर्मचारी संघटनांनी के ली आहे.

जनतेचा संमिश्र प्रतिसाद

दोन टप्प्यांमध्ये दुकाने, रिक्षा-टॅक्सी, वाहन दुरुस्ती आदी सुरू झाले आहेत. मोठय़ा प्रमाणावर कारखाने किं वा उद्योगही सुरू झाले आहेत. अर्थचक्र  गतिमान व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. व्यवहार सुरू झाल्यावर बहुतांश ठिकाणी लोकांकडून सावधगिरी बाळगण्यात येत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी मात्र गर्दी होत असल्याचेही निदर्शनास आले. गर्दी वाढल्यानेच शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस काही ठिकाणी दुकाने स्थानिक प्रशासनाने बंद के ली. व्यवहार सुरू झाल्यावर लोकांचा संमिश्र प्रतिसाद असल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

देशात रेस्तराँ, मॉल, धार्मिक स्थळांना मुभा

’केंद्र सरकारने सोमवारपासून (८ जून) रेस्तराँ, मॉल, धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

’दोन महिन्यांहून अधिक काळ

बंद राहिलेली ही सार्वजनिक ठिकाणे सुरू होणार असली तरी, प्रत्येक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे लागणार आहे. ’धार्मिक स्थळे खुली केली जाणार असली तरी, प्रसाद वाटपाला तसेच, धार्मिक कार्यक्रमांनाही मनाई आहे. केंद्राचा हा आदेश देशभर लागू होणार असला तरी, महाराष्ट्र, गोवा आदी काही राज्यांनी ही ठिकाणे खुली न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार या पट्टय़ातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट व एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे किं वा नाशिकबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून नियोजन के ले जाईल.

 – सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending