September 24, 2024

विजय चौधरी यांना मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता पत्रकारिता पुरस्कार

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी यांना उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणाऱ्या मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम क्रमांकाचा पत्रकारिता पुरस्कार उदगीर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान सन्मानपूर्वक करण्यात आला. स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील सर्वाधिक पुरस्कारांचे मानकरी होण्याचा बहुमान विजय चौधरी यांना मिळाला आहे. गेल्या तीन दशकांपासून खुलताबाद येथील पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीत विजय चौधरी यांना तीस पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. हा मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

उदगीर तालुका पत्रकार संघाचा सन २०२१ चे मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून दिले जाणाऱ्या पुरस्काराचा वितरण सोहळा उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाचे सभागृह नांदेड रोड उदगीर येथे रविवारी १७ एप्रिल २०२२ रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटिल नागराळकर तर प्रमुख पाहूणे म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार आंतरभारतीचे सचिव अमर हबीब, साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी हे उपस्थित होते.

उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या तेरा वर्षांपासून दरवर्षी उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून मराठवाडास्तरीय पुरस्कार दिले जातात. यामध्ये जेष्ठ संपादक सुर्यप्रकाश धूत यांना जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ वार्ता गटात प्रथम पुरस्कार दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे खुलताबाद येथील प्रतिनिधी विजय चौधरी यांच्या ‘शेतमाल उद्योगासाठी टाटांना साकडे’ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ, व्दितीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे ढोकी जि.उस्मानाबादचे प्रतिनिधी सुरेश कदम यांना ‘ऊसाचे क्षैत्र वाढले, अतिरिक्त ऊस प्रश्न भेडसावणार’ या बातमीस अमोल निडवदे यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ, दैनिक दिव्य मराठीचे उमरगा प्रतिनिधी प्रदीप भोसले यांच्या ‘आपत्तीत संधी शोधत धरली प्रगतीची कास’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने तृतीय पुरस्कार जळकोट जि.लातूर येथील दैनिक यशवंतचे प्रतिनिधी माधव होनराव यांच्या ‘संगीता दामरे यांच्या यशाला मेहनतीची किनार, नौकर राहून पत्नीला शिकवले, पत्नी बनली सरकारी कर्मचारी’ या बातमीस पत्रकार कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ , देण्यात येणार आहे.शोध वार्ता गट प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे अंबाजोगाई जि. बीड येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या ‘जिवावर उदार होऊन ४०० रु रोजाने करतात काम’ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ,व्दितीय पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे किनगाव ता.अहमदपूर जि.लातूर येथील प्रतिनीधी असलम शेख यांच्या ‘शासकीय विश्राम गृहाची इमारत मृत अवस्थेत’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने, सिल्लोड जि.औरंगाबाद येथील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी राजू वैष्णव यांच्या ‘साठ गावानी कोरोनाला वेशीवर रोखले’ या बातमीस जेष्ठ संपादिका श्रीमती निर्मलाताई बांगे यांच्यावतीने कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ, तृतिय पुरस्कार कंधार जि.नांदेड येथील दैनिक बहुरंगी वार्ताचे प्रतिनिधी राजेश कांबळे यांच्या ‘कोरोना रुग्णासाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार प्राप्त पत्रकारांना सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले आहे. परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा,शिवशंकर पटवारी लातूर व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. बाळासाहेब दहीफळे यांनी काम पाहिले तर जेष्ठ पत्रकार दैनिक सिध्देश्वर समाचारचे संपादक सुर्यप्रकाश धुत यांची पत्रकार अॅड एल. पी.उगीले, व्ही.एस.कुलकर्णी, प्रा.प्रविण जाहूरे, डाॅ.धनाजी कुमठेकर या निवड समितीने जीवन गौरव पुरस्काराची निवड केली आहे. पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातील विजेत्यांना प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव दयानंद बिरादार यांनी आभार मानले.

फोटो ओळ: खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी यांना मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता पत्रकारिता पुरस्कार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending