September 24, 2024

आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयात आयोजन

0
Contact News Publisher

संस्थापक अध्यक्ष डॉ. मजहर खानसह मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उपस्थित राहणार

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खुलताबाद येथे दि. २२/०४/२०२२ वार शुक्रवार रोजी ग्रंथालय विभाग व गृहशास्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “Introspection Prognosis and Strategy For Global Water Resources Environment, Agriculture, Science and Technology” या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन आमचे प्रेरणास्थान कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मजहर खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या ई-परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. मजहर खान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कमरून्निसा बेगम, आयोजक डॉ. मनीषा वंजारी मॅडम व श्रीमती. सारिका रेनगुंठवार मॅडम, तर सह-आयोजक उपप्राचार्य डॉ. मधुकर हिवाळे, उपप्राचार्य डॉ. रफिऊल्लाह खान, डॉ. शेख मोहम्मद आरिफ, व्यवस्थापक बादशहा शेख, शिक्षक सय्यद इरफानसह सर्व आयोजन समितीचे सदस्य व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. सदरील परिषदेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending