September 23, 2024

औरंगाबादेत जातीय सलोखा निर्माण करणाऱ्या होर्डिंगची चर्चा

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो

औरंगाबाद: एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंगे असो किंवा हनुमान चालीसा असो यावरून राजकारण तापलेले असताना त्यांतच औरंगाबाद शहरात राज ठाकरेंच्या सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदित्य दहीवाल मित्रमंडळाच्या वतीने लावण्यात आलेले व जातीय सलोखा निर्माण करणारे होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेतय दहीवाळ मित्र मंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या या हिर्डिग वर ” दोस्ताना कम से कम इतना बरकरार रखो की..मजहब बीच में न आये.! कभी तुम उसे मंदिर तक छोड दो, कभी वो तुम्हे मस्जित छोड आये.!! अशा आशयाचे मजकूर असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नागरिक ही या होर्डिंगचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून हे फोटो सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान येत्या एक तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी अजून परवानगी मिळालेली नसतानाही मनसे पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाला आहे. मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तरसभेतही राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्याच्यासमोर डबल आवाजात हनुमान चालीसा वाजवा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending