September 23, 2024

राज ठाकरेंना औरंगाबादेतील सभेपूर्वी खासदार इम्तिजाय जलील यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आमंत्रण

0
Contact News Publisher

राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार जलील यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली आहे

  • क्राईम टाईम्स टीम

महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी आज ते पुण्यावरून औरंगाबादच्या दिशेने रवाना देखील होत आहेत. राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय, या सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं, अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार आहे. औरंगाबादेतील राजकीय परिस्थिती पाहता, राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना या बहुचर्चित सभेअगोदर इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.
याचबरोबर राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार जलील यांनी काल औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली आहे.

खासदार जलील यांना पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले की, मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना हे देखील सांगितले आहे की, आपल्या शहरात शांतात आणि सुव्यवस्था राहावी यासाठी आमची कशाप्रकारे तुम्हाला मदत अपेक्षित आहे ते तुम्ही सांगावं.

राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल. असं म्हणत जलील यांनी या इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचं राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending