September 23, 2024

खुलताबाद- सुलीभंजन/नंद्राबाद ग्रामपंचायत सरपंच पद कायम

0
Contact News Publisher

ग्रामपंचायत सुलीभंजन / नंद्राबाद येथील सरपंच सय्यद इलियास सय्यद युनूस यांचे सरपंचपद रद्द करण्याचा अर्ज फेटाळला.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

ग्रामपंचायत सुलीभंजन / नंद्राबाद येथील सरपंच सय्यद इलियास सय्यद युनूस यांच्या विरोधात त्यांनी त्याच्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग करूने अली इरफार ज्युनीअर कॉलेज तसेच इमिएबल चॅरिटेबल ट्रस्ट यांना बांधकाम परवानगी दिली होती म्हणून त्यांचे पदद रदद करण्यासाठी तक्रारदार श्रीमती गंगला दिलीप बनकर, रा. सुलीभंजन यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम में कलम ३९ (१) अन्वये कार्यवाही करणेबाबतचा तकार अर्ज मा. अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे कार्यवाही दाखल केली होती. म्हणून मा. अपर आयुक्त औरंगाबाद यांनी प्राथमिक चौकशीसाठी सदरची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद औरंगाबाद यांच्याकडे पाठविली होती. त्यानंतर सदर प्रकरणात गैरअर्जदार सय्यद इलियास सय्यद युनूस यांच्या तर्फे अॅड. इश्तियाक अहेमद पटेल (निहाल (पटेल) यांनी हजर होऊन युक्तीवाद केला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण हे अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुनावणीसाठी पाठविण्यात आले.

श्री बेलदार साहेब मा. अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी सुनावणीची संधी देऊन प्रकरणात मंगला दिलप बनकर यांचे वकिलांचा युक्तिवाद ऐकुन तसेच सरपंच सय्यद इलियास सय्यद युनूस यांच्या तर्फे अॅड. इश्तियाक अहेगद पटेल (निहाल पटेल ) याचा युक्तिवाद ऐकुन मंगला दिलीप बनकर यांनी दाखल केलेला तकार अर्ज हा फेटाळलेला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending