September 23, 2024

सार्वत्रिक निवडणूक: राज्यातील 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितीची प्रभाग रचना – औरंगाबादचा समावेश

0
Contact News Publisher

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दि. 8 ते 14 फेब्रुवारी 2022 या दरम्यान प्रभाग रचना करण्यासाठी संबधितांना हजर राहण्यासाठी सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाचे दि. 4/10/2011 च्या आदेशासोबतचे प्रपत्र – 1, प्रपत्र – 3, प्रपत्र-4, प्रपत्र-6 व प्रपत्र 7 मधील माहिती (हार्ड तसेच सॉफ्ट कापी Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या 25 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 284 पंचायत समितीचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending