September 22, 2024

औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय, औरंगाबादमध्ये एकटे फिरा, लोक तुम्हाला हंड्याने मारतील- इम्तियाज जलील

0
Contact News Publisher

औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय, औरंगाबादमध्ये एकटे फिरा, लोक तुम्हाला हंड्याने मारतील, असं टीकास्त्र इम्तियाज जलील यांनी डागलंय.

  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद : औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या मुद्द्यावरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीये. औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय, औरंगाबादमध्ये एकटे फिरा, लोक तुम्हाला हंड्याने मारतील, असं टीकास्त्र इम्तियाज जलील यांनी डागलंय.

“नामांतराच्या विषयावरुन राजकारण करणं मुख्यमंत्र्यांनी बंद करावं. लोकांना नामांतर वगैरे काही नको आहे. त्यांना पाणी हवंय. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाहीये. तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर पाणी घेऊन या. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादला एकटे या आणि नामांतर विषयावर बोलून दाखवावं, लोक तुम्हाला मारतील, असं जलील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले, “औरंगाबादेतील भाजप नगरसेवक असणाऱ्या वॉर्डात जा, तिथे आमच्या आया-बहिणींना भेटा आणि त्यांना विचारा, नामांतर हवं की पाणी हवं? ते तुम्हाला नामांतराच्या विषयावरुन शिव्या घालतील. पाणाच्या मुद्द्यासाठी आग्रह धरतील”

“सत्तेचा इमला चढण्यासाठी यांना राजकारण करायचंच. समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी यांना राजकारण करायचं नाही. त्यात फडणवीस आणि ठाकरे दोघेही येतात. त्यामुळे असल्या राजकारण्यांनी आता राजकीय खेळ्या थांबवून जनतेच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे”, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी आजी माजी मुख्यमंत्र्यांना सुनावलं.

औरंगाबादच्या नामांतरावरुन उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे?”, असा सवाल करत औरंगाबाद नामांतर वाद मुख्यमंत्र्यांनी निकाली काढला. बीकेसी मैदानावर घेतलेल्या सभेत त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलं. मी आताही औरंगाबादला संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले..

औरंगाबादच्या नामांतरावरुन देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची गरज काय? ओ खैरे, व्हा आता बहिरे…. औरंगाबादचा केलाय कचरा… भाजपचं सरकार येईपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर विसरा”, अशा शब्दात नामांतरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी सेनेवर हल्ला चढवला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending