September 22, 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र 2022 लाभ, पात्रता, कागदपत्रे, असा करा अर्ज

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शासन परिपत्रक GR, काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. मित्रांनो जर तुम्हला लहान मुलगी असेल तर हि योजना तिच्यासाठीच आहे. या योजनेचे लाभ हे सर्वाधिक मिळणारे आहेत. त्यामुळे या योजनेचे लाभ नक्कीच वाचा. पात्र असल्यास अवश्य या योजनेचा लाभ घ्या.

माझी कन्या भाग्यश्री योजना

राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुकन्या योजना सुरू करण्यात आली. सुकन्या योजनेचा लाभ दिनांक १ जानेवारी २० पासून जन्मणाऱ्या मुलींकरता अनुज्ञेय राहणार आहे. केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या केंद्रपुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद व जालना यांची निवड करण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर १,००० मुलांच्या मागे ८९४ इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलांनी एकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे या उद्दिष्टाने बेटी बचाव बेटी बेटी पढाव या योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशा सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक नवीन योजना २०२१ राबविण्यात येत आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये –

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये प्रमाणे असतील.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे.

त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.

मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.

बालिका भ्रूणहत्या रोखणे.

बालविवाह रोखणे.

मुलांनी इतकाच मुलींचा ही जन्मदर वाढवणे.

सुकन्या समृद्धि योजना (PMSSY)मराठी माहिती benefits,bank list, eligibility

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय –

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.
माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विलीन करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ देण्यासाठी तसेच दारिद्र रेषेखालील एपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीसाठी तक्ता क्रमांक दोन मधील एक लाभ देण्यात येणार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending