September 22, 2024

राज्यसभेसाठी छत्रपती संभाजीराजेंना MIM चा पाठिंबा; राजे तुमच्यासाठी कायपण!

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. दरम्यान, संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय.

संभाजीराजे म्हणाले, माझ्या उमेदवारीची चर्चा सुरु असताना, अनेकजण माझ्यासाठी अटी टाकत होते, काही बंधनं बांधू इच्छित होते. त्याचवेळी काही पक्षातील आमदारांनी तसेच अपक्ष आमदारांनी आपल्याला फोन करुन पाठिंबा दर्शवला होता, असं राजेंनी आवर्जून सांगितलं. अगदी एमआयएमच्या मुस्लिम आमदारानं देखील आपल्याला पठिंब्यासाठी फोन केला. राजे तुमच्यासाठी कायपण, उमेदवारी अर्ज भरायच्या आधी अनुमोदन म्हणून तुम्ही फक्त आवाज द्या, हा मावळा तुमच्या सेवेला हजर असेल, असं एमआएम आमदार फारुक शहा (MIM MLA Farooq Shah) यांनी संभाजीराजेंना फोनवरुन सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

आजच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे पुढं म्हणाले, सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. पुण्यातील पत्रकारांनी पीसी ऐकल्यावर मला विचारलं हा भाभडेपणा नाहीये का? मी म्हटलं हो. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पहायचं होतं. सर्व अनुभवायचं होतं. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं, असं त्यांनी नमूद केलं.

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी १० आमदारांचं अनुमोदन लागतं. अनेक पक्षाच्या आमदारांनी, तसेच अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना फोन करुन पाठिंबा दर्शवला. यादरम्यान धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी संभाजीराजेंना फोन करुन आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मला आपल्याला पाठिंबा द्यायचाय, अनुमोदनासाठी सही करायला कधी येऊ ते मला कळवा, एका मावळ्याला छत्रपतींची सेवा करायचीय, असं त्यांनी संभाजीराजेंना सांगितलं. तर दुसरीकडं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी देखील संभाजीराजे राज्यसभेवर गेले पाहिजेत, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending