September 22, 2024

भाजपाला धक्का!; एमआयएमचे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election)भाजप (BJP)आणि महाविकास आघाडीने (MVA)अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची मतं मिळवण्यासाठी धडपड सुरु केली आहे. या आमदारांची मते आपल्या पदरात पडावी यासाठी शिवसेनेकडून शक्य त्या सर्व राजकीय पर्यायांची चाचपणी केली जात आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून (Shivsena) एमआयएम पक्षाचा पाठिंबा घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी एमआयएमचे आमदार फारुख शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र या भेटीत पाठिब्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर आम्ही नक्कीच विचार करू, असे ओवेसी म्हणाले.

तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला जिंकविण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचा आहे.
जर महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा हवा असल्यास त्यांनी तो खुलेपणाने मागावा. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांना मदत हवी असेल तर आम्ही त्याबाबत विचार करू, असे जलील म्हणाले. त्यामुळे शिवसेना आपल्या उमेदवारासाठी एमआयएम पक्षाची मदत घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending