September 21, 2024

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

0
Contact News Publisher

ज्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना ऑनलाईनव्दारे वैयक्तिक शौचालयाची मागणी करता येईल असे पत्र औरंगाबाद जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गठणे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्याना काढले आहेत.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

शौचालयाबाबतची मागणी करणेबाबत. संदर्भ- मा. अवर सचिव, म.शा., पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई यांचे पत्र क्र. स्वभामि २०२२ / प्र.क्र.१३६ /पापु-१६/दि. २३/५/२०२२.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) टप्पा २ अंतर्गत ज्या लाभार्थी

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना ऑनलाईनव्दारे वैयक्तिक शौचालयाची मागणी करता येईल, असे कळविले आहे.

ऑनलाईन मागणीच्या अनुषंगाने कुटुंबांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहेत :

१. स्वच्छ भारत अभियान (ग्रा) या संकेत स्थळावर http://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा

http://sbm.gov.in//sbmphase२/homenew.aspx ही लिंक उपलब्ध आहे.

२. अर्जदाराने नोंदणी (रजिस्ट्रेशन) करतांना आवश्यक माहिती भरावी.

३. नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, नोंदणीकृत लॉगिन ID व पासवर्डचा वापर करुन, अर्जदाराने वैयक्तिक शौचालयासाठी मागणीचा अर्ज करावा. अर्ज सादर केल्यानंतर संदर्भ क्रमांक तयार होईल. या क्रमांकाव्दारे केलेल्या अर्जाची स्थिती अर्जदारास जाणून घेता येईल.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

४. अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर जिल्हा तसेच तालुकास्तरावर अर्ज ऑनलाईन मंजुरीसाठी उपलब्ध होतील. सदर अर्ज तपासून पात्रतेच्या निकषानुसार मंजूर/ नामंजूर करण्यात येईल. यासाठी जिल्हयाचा स्वच्छ भारत मिशन (SBM) प्रणालीवर लॉगिन आणि पासवर्ड वापरण्यात यावा.

५. सादर करण्यात आलेल्या अर्जाची माहिती DB ०१ Module मध्ये उपलब्ध होईल.

online application 2022 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती

तालुकास्तरावर नोंदणीकृत अर्जाची छाननी करतांना खालील बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे :

१. सदर अर्जावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, लाभार्थी निकषानुसार पात्र ठरणारा असावा. सदरची बाब ऑनलाईन अर्जांची यादी ग्रामपंचायत निहाय तालुक्याकडून ग्रामपंचायतीस प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवकाने प्रमाणित करावी.

२. सदर लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून वैयक्तिक शौचालयाचा लाभ घेतलेला नसावा. अथवा त्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाही, याची खातरजमा ग्रामसेवकाने दक्षतेने करावी.

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करतांना, अर्जदारास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, अर्जदार ऑफलाईन पध्दतीने मागणी अर्ज सादर करु शकतील. अशा प्रकारे ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाच्या बाबतीत, तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणा, SBM-MIS प्रणालीवर PM १२ या module च्या माध्यमातून, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करतील.

“ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करणे” या उपक्रमाची प्रसिध्दी करण्यासाठी, स्व.भा.मि.(ग्रा) टप्पा II अंतर्गत, माहिती, शिक्षण व संवाद घटकांतर्गत गावागावामध्ये विविध कार्यक्रम राबवावेत. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना आपल्यास्तरावर निर्देश देण्यात यावे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending