September 21, 2024

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

0
Contact News Publisher

कंत्राटी सेवेकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गत 1) MO MBBS, 2) MPW-Male 3) Staff Nurse 4) Lab Technician यांची कंत्राटी सेवा घ्यावयाची आहे. सदरील सेवा दि. ३१/०३/२०२३ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर उपलब्ध करायची असून, सामाजिक आरक्षणानुसार सदर कंत्राटी सेवेची जाहिरात

येथे क्लिक करून औरंगाबाद:आरोग्य विभाग विविध जागा पत्र पहा

http://www.zpaurangabad.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/

या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये अपेक्षित शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी व शर्ती नमूद करून सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना प्राप्त करून घेऊन विहित शुल्कासहित संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक ११/०८/२०२२ रोजीपर्यंत निम्न उल्लेखित सेवांसाठी परिपूर्ण भरलेल्या अर्जासहित शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून पोस्टाद्वारे किंवा समक्ष सादर करावेत.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

सदर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. कंत्राटी सेवा उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही अनधीकृत व्यक्तीकडून त्यांचे राजकीय संबंध आहेत तसेच अधिकारी यांच्यासोबत ओळखी आहेत आणि आपण कंत्राटी सेवा लावून देऊ असे सांगून आपल्याकडून पैसे घेऊन उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता असते. सदर प्रक्रियेदरम्यान कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास अथवा वशिलेबाजी करावयाचा प्रयत्न झाल्यास तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांना कळवावे.

येथे क्लिक करून सविस्तर आरोग्य विभागाची जाहिरात पहा

crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे

‘मतदान कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी जोडा (संलग्न) करावे – मुख्य निवडणूक विभाग

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending