September 21, 2024

महाराष्ट्र राज्यात १ कोटी ६६ लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसणार; समजून घ्या स्मार्ट मीटर..

0
Contact News Publisher

राज्यातील वीज वितरण यंत्रणा अत्याधुनिक करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार राज्यातील एक कोटी ६६ लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार असून महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होण्याचा अंदाज आहे.

  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

राज्यातील वीज वितरण यंत्रणा सुधारण्यासाठी वितरण क्षेत्र योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहित्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरिंग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतूद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण एक कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच चार लाख सात हजार वितरण रोहित्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलार्इन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर बसवण्यात येतील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील दोन लाख ६० हजार ४१७ ग्राहक; तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट मीटर बसवण्यात येतील.

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्च दाब वीज वापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडेदेखील हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगरशेतीसाठीची दोन लाख ३० हजार ८२० वितरण रोहित्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीज वाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५ वीजग्राहकांकडेही हे स्मार्ट मीटर बसवले जातील.

crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

वाणिज्यिक व तांत्रिक हानी २५ टक्क्यांपर्यंत असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६ ग्राहकांना स्मार्ट मीटर आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची एक लाख ७६ हजार ६८७ वितरण रोहित्रांचे स्मार्ट मिटरिंग करण्यात येणार आहे. अशा एकूण एत कोटी ६६ लाख ग्राहकांना; तर चार लाख सात हजार वितरण रोहित्रांना आणि २७ हजार ८२६ वीजवाहिन्यांना स्मार्ट मीटर बसवणे प्रस्तावित असल्याचेदेखील विजय सिंघल यांनी सांगितले आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending