खुलताबाद- वेरूळ घाटात अपघात; एक ठार सहा जखमी
खुलताबाद परिसरातील वेरूळ घाटात टेम्पोचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकजण ठार झाला असून, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोतील लोक देवदर्शनासाठी जात होते.
शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील दहा ते बारा भाविक जातेगाव येथे देव दर्शनासाठी चालले होते. त्यांच्या टेम्पोचा वेरूळ घाटात अपघात झाला. टेम्पो उलटून एक भाविक ठार झाला तर अन्य सहा गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रवाना केले आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा