September 22, 2024

सुलतानपूर येथे किराणा दुकानात धाडशी चोरी, रोख रक्कमेसह ७०हजाराचा माल लंपास

0
Contact News Publisher

परिसरात भीतीचे वातावरण; घटनास्थळाची पहाणी करताना पोलीस कर्मचारी

  • क्राईम टाईम्स टीम
  • अतुल वेताळ

हेही वाचा: खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

सुलतानपूर :खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील भारत नजन यांच्या गुरुकृपा किराणा दुकानातून शनिवारी दि.२१ रोजी मध्य रात्री आज्ञात चोरट्यनी शटरचे सेंटर लॉक आणि लॉक पट्टी तोडून दुकानात प्रवेश करून ४० हजार रुपय किमती किराणा समान आणि गल्ल्यातील रोख ३० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपयेचा माल लंपास केला.
रविवारी सकाळी ६ वाजता( दि.२२ )कावेरी नजन दुकाना पुढे सफाई साठी गेली असता त्यांना दुकानाचे शटर तोडून चोरी झाल्याचे लक्षत आले.त्यांनी ही घटना त्यांचे पती भारत नजन यांना कळविले.भारत नजन यांनी दुकानाची पहाणी करून घटनेची माहिती पोलीस पाटील तेजराव चव्हाण व खुलताबाद पोलीस ठाण्यात दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुरमे यांनी घटनास्थळाची पहाणी करून पंचनामा केला. भारत नजन यांच्या तक्रारी वरून खुलताबाद पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक भुजंगराव हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार वारे तपास करीत आहे.

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण; प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल

दरम्यान घटनेमुळे सुलतानपूर बाजारपेठेतील
व्यापाऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच महामार्गावर रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी व्यापारी वर्गातून होत आहे.

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending