September 22, 2024

सर्व्हेतून मोठा खुलासा : उद्धव ठाकरेंच्या बाजूने ७४ टक्के जनता: शिंदे गट आणि भाजपला धोबीपछाड

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) झालेल्या ऐतिहासिक बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसमोर पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे आणि ३९ आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)खूपच सक्रिय झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपला (BJP)टक्कर देण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात नव्या राजकीय समीकरणाच्या नांदीची सुरूवात केली आहे. त्यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे शिंदे गट आणि भाजपला टक्कर देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आणि अशातच उत्तर भारतातील एक प्रमुख वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे हे शिंदे गट आणि भाजपला धोबीपछाड देणार आहेत. (74 percent of the people are in favor of Uddhav Thackeray)

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरुन अमर उजाला या वृत्तपत्राने ऑनलाईन सर्व्हे केला. या सर्व्हेत उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला टक्कर देऊ शकतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. या ऑनलाईन सर्व्हेत एकूण १६ हजार लोकांनी भाग घेतला. यातील ७५ टक्के लोकांनी उद्धव ठाकरे शिंदे गट आणि भाजपला चांगलीच टक्कर देणार असल्याचे म्हटले आहे. तर २४ टक्के जनतेने नाही असे उत्तर दिले आहे. सत्तासंघर्ष महाराष्ट्रातील असला तरी संपूर्ण जनतेचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे, हे या सर्व्हेतून उघड झाले आहे.

Braking news -उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; सरन्यायाधीश रमण्णांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करत मोठी खेळी खेळली आहे. मराठा संघटना आणि नेत्यांचा भाजपवरील वाढता विश्वास लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी मराठ्यांचे मोठे संघटन हाताशी धरत भाजपविरोधात मोठी रणनीती आखली आहे. मराठा समाजाला बगल देत बहुजन समाजाला आपलंसं करण्याची आतापर्यंतची शिवसेनेची भूमिका होती. मात्र आता याच भूमिकेला छेद देत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मराठा राजकारणाला मोडीत काढण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending