September 22, 2024

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

0
Contact News Publisher

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द; वाढीव मदतीबाबत शासन निर्णय जारी

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

मुंबई, दि. १० – जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या  पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते.

CROP यादी : शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी 27 ते 36 हजार रुपये खात्यात जमा होणार : शासन निर्णय

त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

लाचखोर कृषी सहाय्यक ‘अडकला’ अँटिकरप्शनच्या जाळ्यात; कांदाचाळ अनुदान..

औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात  येईल.

I LOVE YOU म्हण नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन; मजनूविरोधात गुन्हा दाखल: औरंगाबादेतील घटना

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending