अंधारी येथे बैलजोडी चोरीचा प्रयत्न फसला ; आरडा-ओरड करताच चोरट्यांनी बैलजोडी सोडून धूम ठोकली

हीच बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला होता
असा फसला चोरट्यांचा प्लॅन
- प्रतिनिधी
- दिपक सिरसाठ
अंधारी :सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील झाडी वस्ती शिवारातील मुरलीधर आनंदा ढवळे यांच्या गोठ्यात दावणीला बांधलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला.परंतु सुदैवाने सदरील शेतकर्यांचा नातु हा बैल जोडीला दान देण्यासाठी गोठ्यावर गेला असता त्याला दावणीला बांधलेले बैल गोठ्यात दिसले नसल्याने त्याने आरडा ओरड करून घरच्यांना बोलावले घरातील सर्व सदस्यांनी यावेळी शोधाशोध केली असता अज्ञात चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आपे मध्ये बैलांना ओढत असतानाच शेतकर्यांचा आवाज आल्याने चोरट्यांनी धूम ठोकली
औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
ही घटना शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की अंधारी येथील झाडी वस्ती शिवारात राहणारे शेतकरी मुरलीधर आनंदा ढवळे यांच्या शेतातील गोठ्यात दावणीला बांधलेली बैलजोडी होती सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असल्याने बैलजोडीला दान देण्यासाठी त्यांचा नातू गोठ्यात गेला असता बैलजोडी तेथे दिसून आली नाही त्यांनी आरडाओरड करून घरच्यांना बोलावले घरातील सर्व सदस्यांनी गोठ्याशेजारील सर्व परिसर पिंजून काढला परंतु जोराचा पाऊस त्यात अंधार जवळपास अर्धा तास सर्वांनी बैलजोडीची शोधाशोध केली त्यांनी बैलजोडीला आवाज दिला तर त्यांना अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी सोडून आपे सुसाट वेगाने घेऊन पळून गेले
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
कृषी मंत्री बळीराजाच्या घरी मुक्काम; माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमास सुरुवात
सदरील शेतकर्यांनी वेळीच शोधाशोध केल्याने चोरट्यांचा बैलजोडी चोरून नेण्याचा प्रयत्न फसला.यावेळी शेतकरी मुरलीधर ढवळे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले.गेल्या तीन दिवसांपासून आमची बैलजोडी कुणीतरी चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत.गुरुवारी रात्री नित्यनियमानं दिवसभर शेतात काम करून रात्रीला बैलजोडी गोठ्यात बांधलेली असता सकाळी चारापाणी करण्यास गेलो परंतु बैलजोडीच्या गळ्यातील घंटी घागर माळ जमिनीवर पडलेली दिसली परंतु रात्रीला पडली असेल याकडे आम्ही दुर्लक्ष केले.
औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….
शुक्रवारी रात्रीही तसेच झाले घागर माळ घंटी व कासरा कापलेल्या अवस्थेत बैलजोडी मोकळी गोठ्यात दिसली.परंतु शनिवारी रात्री बैलजोडीला दान देण्यासाठी नातू गोठ्यात गेला असता त्यांनी वेळीच आरडाओरड करून घरातील सर्व सदस्यांना बोलावून शोध मोहीम सुरू केली जोराचा पाऊस त्यात अंधार परंतु दोन दिवसांपासून घडत असलेल्या प्रकारामुळे बैलजोडी चोरीची भीती मनात होतीच आमचा आवाज ऐकल्याने अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी तेथेच सोडून आपे घेऊन धूम ठोकली जोराचा पाऊस व अंधार असल्यामुळे अज्ञात चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले असे त्यांनी बोलताना सांगितले
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022