September 22, 2024

खुलताबाद | भडजी-ममनापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाचे सदस्यत्व पद रद्द ; जिल्हाधिकारी यांचा आदेश

0
Contact News Publisher

सदर अर्जदार श्री.अजय भानुदास जाधव माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत भडजी- ममनापूर यांनी भडजी -ममनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य श्री.उत्तम सांडू मोरे यांना सन २००३ नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे,त्यांचे चालू असलेले( सध्या ग्राम पंचायत सदस्य पदावर कार्यरत असलेले) ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्याकरिता अँड श्री.शरद भागडे पाटील यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद,यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज १ व १६ नुसार प्रकरण दाखल केले होते. त्यामध्ये मा.गटविकास अधिकारी, कार्यालय, पंचायत समिती खुलताबाद व मा. तहसीलदार, कार्यालय, तहसील खुलताबाद यांचा चौकशी अहवाल मागून घेण्यात आला.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री. उत्तम सांडू मोरे यांना शासनाने नियत केलेल्या तारखेनंतर सुनावणीच्या वेळेस तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यामुळे,त्यांचे चालू असलेले ( सध्या कार्यरत असलेले ग्रामपंचायत सदस्यत्व पद)भडजी -ममनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी आदेश पारित केलेला आहे. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून पाय उतार करण्यासंबंधी आदेश पारीत करण्यात आला आहे.

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

त्यामुळे सदर ग्रुप ग्रामपंचायत मनापूर -भडजी ग्राम पंचायत सदस्य पद हे तिसऱ्या आपत्यामुळे रद्द झाले. यामुळे पंचक्रोशी मध्ये सदस्य पद रद्द झाल्यामुळे चर्चेला उधान होते व हा चर्चेचा विषय प्रामुख्याने चर्चेचा विषय ठरला .तरी सदर प्रकरणात श्री.अजय भानुदास जाधव( माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत भडजी- ममनापूर) यांच्यातर्फे अँड श्री. शरद भागडे पाटील यांनी बाजू मांडली. त्यांना सहाय्यक म्हणून अँड श्री.शेख अय्याज यांनी त्यांना सहकार्य केले ( संबंधित प्रकरणात युक्ती वाद केला)तर गैर अर्ज दारा अर्जदारा तर्फे एडवोकेट श्री अब्बास पटेल यांनी युक्तिवाद करून बाजू मांडली.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

खुलताबाद येसगावं गिरजा मध्यम प्रकल्पमध्ये विजेने घेतला एकाचा बळी तर एक जखमी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending