September 21, 2024

हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती.??

0
Contact News Publisher

अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याचे चिञ निर्माण झालेआहे

  • क्राईम टाईम्स टीम
  • दिपक सिरसाठ

अंधारी : यावर्षी हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती…?? असा प्रश्न शेतकर्‍या समोर उभा झाला असून अतिवुष्टीमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होणार असल्याचे चिञनिर्माण झाल्याने शेतकरी झाले हवालदिल झाले आहे,

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस येणार या आशेने मोठ्या प्रमाणावर धुळपेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने अनेकांच्या धुळपेरण्या बुडाल्या.खंड पडल्यावर पाऊस पडला तेव्हा कपाशी ची उर्वरित राहिलेल्या शेतकर्यांना पेरणी करावी लागली. अशातच जुलै आँगष्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे मका कपाशी, तुर ही पिके नाजूक बनली .शेतजमिनी चिबडल्याने कपाशी पिकांची आवश्यक अशी वाढ झाली नाही त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळेच यंदा कपाशी पिकाची वाढ थांबली असल्याने हातभर वाढलेल्या कपाशीला बोंड्या लागणार तरी किती असे निर्माण झाले आहे
. सध्या कपाशीच्या झाडाला चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली पाती फुले कमी प्रमाणात लागल्या आहेत. गेल्या तीनचार दिवसापासून पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने पुन्हा आलेल्या पाती फुलांची गळती होत आहे त्यामुळे कपाशी पिकाचे उत्पादन ही कमी होण्याची भीती शेतकर्‍याकडून व्यक्त केल्या जात आहे .कपाशीच्या झाडांची चांगली वाढ झाली तरच उत्पादनात वाढ होते असे उत्पन्नाचे शेतकरी गणित असते,यावर्षी कपाशी झाडांची वाढच झाली नसल्याने उत्पादन खर्च ही भरून निघणार नाही अशी परिस्थिती तालूक्यासह अंधारी परिसरात निर्माण झाली आहे,अतिवृष्टीच्या पावसाने शेतशिवारात कपाशीचे पिके कूठे हितभर तर कूठे हातभर अशी कपाशी वाढली आहे याचे कारण म्हणजे झालेली अतिवुष्टी . आता पुन्हा परतीचा पाऊस पडायचा शिल्लक आहे. वारंवार होणाऱ्या अतिवुष्टीचा सर्वात जास्त फटका हा कपाशी पिकांना पडत असल्याने कपूस उत्पादक शेतकरी अतिवृष्टीच्या फटक्यात सापडला असून शेतीला लागणारा खर्च ही निघणे मूश्कील झाले असून पून्हा अतिवषष्टिने शेतकरी हवाल दिल झाले आहे,
——————–
(कोट ) शेतकर्‍यावर अतिवृष्टीचे संकट कोळसले आहे……
यावर्षी अतीप्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील कपाशी पिकात गवत तण सर्वाधिक वाढले, ,पावसामूळे डवरे चालत नव्हते यामूळे निंदनाचा सर्वाधिक खर्च झाला अतिपावसानी शेतातील कपाशी पिकांची उच वाढली नाही,यंदा अतिवृष्टीमूळे कपाशी उत्पनात मोठया प्रमाणात घट होणार असून शेतीला लागलेला खर्च ही निघणार नाही..…. (भिकन तायडे शेतकरी अंधारी )
————–
(चौकट) खानदेशात कापसाला मुहूर्ताचा १२ हजाराचा भाव मिळाला आहे. चांगल्या भावाचे संकेत मिळाले असले तरी उत्पादनाची मात्र हमी राहीली नाही. कापसाला चांगला भाव मिळणार असला उत्पादनात घट येणार असे चित्र पहायला मिळत आहे. कपाशीला अतिवुष्टीचा फटका बसला आहे,सर्विकडे कपाशी भाववाढीची चर्चा होत असताना माञ शेतकर्‍यांना कपाशीचे चांगले उत्पादन झाले ही पाहिजेना अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
अंधारी सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात सततच्या पावसाने कपाशी पिकाची वाढ खुंटली असून पीक उत्पन्नाला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending