September 21, 2024

हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नाला यश!; खुलताबाद तहसीलदार यांनी पंचनामे करण्याचे दिले आदेश

0
Contact News Publisher

मा.आ.हर्षवर्धन जाधव यांनी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देऊन प्रत्येक्षात तालुक्यातील काही भागात शेत मालाच्या नुकसानीचे पंचनामे करून व्हिडीओ तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना पाठवले व फोन वरून चर्चा केली आणि केंद्र व राज्य शासन परिपत्रक व शासन निर्णय चा हवाला देत ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याची दखल खुलताबाद तहसील प्रशासनाने सर्व कृषी, महसूल,ग्रामविकास प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तहसील प्रशासनाला दिलेला निवेदन

विषय :- खुल्ताबाद तहसिल अंतर्गत मंडळ निहाय अतिवृष्टी पंचनामे करण्यात यावे तसेच ग्राम पैसेवारी/ आणेवारी समित्या स्थापन करण्यात याव्या.

सदर्भ :- केंद्र व राज्य शासन परिपत्रक व निर्णय

महोदय,

वरिल संदर्भीय विषयी आपणास विनंती करण्यात येते खरिप २०२२, हंगाम सुरू झाल्यापासून खुल्ताबाद तालुक्यातील सर्व मंडळात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके करपली, पिवळी पडत आहेत व भागात पावसाचे पाणी साचल्याने पिके सडत आहेत.

या निवेदनाद्वारे आपणास विनंती कि खरिप २०२२ नुकसानभरपाई अनुदान, पिक विमास पात्र होण्यासाठी नुकसानीचे शासन निर्णय परिपत्रका नुसार पंचनामे करणे गरजेचे आहे. तेव्हा आपण तात्काळ मंडळ निहाय पंचनामे करण्यासाठी आदेशीत करावे तसेच ग्राम पैसेवारी / आणेवारी समित्या स्थापन करण्यासाठी याव्या त्यामुळे झालेली पंचनामे अधिकृतरीत्या वरिष्ठ कार्यालयात कार्यवाही सठी सादर करता येतील.

दि.२५ सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व पंचनामे पुर्ण करण्यात यावे नसता, मा.आ.हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयात सामुहिक तक्रार दाखल करण्यात येईल यांची आपण नौद घ्यावी. धन्यवाद

खुलताबाद तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश- तहसीलदार

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending