September 22, 2024

पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याकडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट!;..साहेब आवरा अन्यथा बांधून ठेवणार.!

0
Contact News Publisher

धामोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी एक पत्र गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पाठवत कंत्राटी अभियंते शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक लूट करीत आहेत त्यांना लगाम घाला अन्यथा गावांतचं त्यांना बांधून ठेवण्यात येईल असे पत्र दिले आहेत.

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रोजगार हमी योजने अंतर्गत विहिर व गायगोठा, मोहगणी वृक्ष लागवड च्या लाभार्थ्याकडून अनुदान वर्ग करण्याच्या बदल्यात पैसे उकळणाऱ्या कंत्राटी अभियांत्र्यांना आवरा अन्यथा त्यांना गावातच बांधून ठेवणे बाबत.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

महोदय,

उपरोक्त विषयी नम्रपणे कळवू इच्छितो की, ग्रामीण भागामध्ये केंद्र व राज्य शासनाचा विविध योजनांचा लाभ हा गरजू गरीब लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, विहीर, गायगोठा अशा विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा ग्रामीण भागातील गरजू व गरीब लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. आजच्या जमान्यात महागाई प्रचंड वाढलेली असताना तसेच या योजनांच्या माध्यमातून मिळणारे अनुदान हे महागाईच्या तुलनेत तुटपुंजे ठरत आहे. तरी देखील गोरगरीब लाभार्थी एक एक रुपया जमवून व शासनाच्या अनुदानाचा आधार घेऊन आपला संसार व मुलाबाळांना एक हक्काचे छत मिळावे म्हणून घरकुल उभा करीत आहे. परंतु शासनाने नेमलेले कंत्राटी अभियंते हे येणाऱ्या अनुदानाच्या बदल्यात या गोरगरीब लाभार्थ्याकडून पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे लाभार्थ्यांनी दिलेल्या आहेत.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर, गाय गोठा व मोगणी वृक्ष लागवड च्या लाभार्थी शेतकऱ्यांकडून देखील हे कंत्राटी अभियंते भरमसाठ पैसा उकळत आहेत. पैसे न दिल्यास मोजमाप मुद्दामहून कमी दाखवून किंवा राग म्हणून संबंधित लाभार्थ्याचे अनुदान हे एम बी बनवताना मुद्दामहून कमी दाखवण्यात येते. शेतकरी व गरजू लाभार्थी हे त्यांना येणारे अनुदान कपात होईल किंवा ते येण्यास विलंब होईल या भीतीपोटी या कंत्राटी

agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज

अभियंत्यांचे बळी ठरत आहेत. हे अभियंते कंत्राटी असल्याने चहापाण्यापुरते म्हणजेच आटे में नमक समजू शकतो, परंतु हे

कंत्राटी अभियंते शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक लूट करीत आहेत.

यामुळे आपणास या निवेदनाद्वारे नम्रतेची व कळकळीची विनंती की, या कंत्राटी अभियंत्यांना वेळीच आवर घाला. यानंतर जर एकाही गरजू व गरीब लाभार्थ्यांकडून अनुदान खात्यावर वर्ग करण्याच्या बदल्यात पैसे घेताना आढळल्यास, त्यांना त्याच ठिकाणी गावात बांधून ठेवण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending