September 22, 2024

अब्दुल सत्तारांकडून दसरा मेळाव्यासाठी 300 बसेस बुक; आगारप्रमुखांना दिले पत्र

0
Contact News Publisher

मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गर्दी जमवण्याची चढाओढ सुरु असतानाच शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबईसाठी 300 बसेस बुक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला पत्र पाठवले आहे. सोयगाव आणि सिल्लोड मतदारसंघातून या बसेस हव्या असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान शिवसेनेला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर शिवसेनेच्या मेळाव्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला अधिक गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे सर्वच मंत्री कामाला लागले.

Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु

दरम्यान औरंगाबादच्या सोयगाव-सिल्लोड मतदारसंघातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे 300 एसटी बसेसची (ST Bus) मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड-सोयगावच्या आगार प्रमुखांना पत्र सुद्धा पाठवले आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

दिनांक 05 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक जाणार असून, यासाठी आपल्या महामंडळाकडून 300 नवीन, सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेसची आवश्यकता आहे. यासाठी असणारी रीतसर प्रक्रिया करण्यास आम्ही तयार आहोत. तरी आपल्या महामंडळाकडून 300 नवीन, सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 संपूर्ण माहिती: Online अर्ज, कागदपत्रे, लाभ, पात्रता

शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून जोरदार तयारी करण्यात येत असून, बसेस बुक करण्यात आल्या आहे. ज्यात उस्मानाबाद 60 बसेस, नाशिक 400 बसेस, अकोला 20 ट्रॅव्हल्स बसेस, नागपूर 10 बसेस, रत्नागिरी 100 बसेस, सिंधुदुर्ग 500 ते 1000 कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार, वर्धा 500 ते 1000 शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहणार, औरंगाबाद (सिल्लोड-सोयगाव) 300 बसेस उपलब्ध राहणार आहेत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending