झरी वडगांवत शेतकऱ्यांना बि-बियाणे सरपंच यांच्या हस्ते वाटप
वडगांव येथील आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला ही मदत म्हणून बियाणे वाटप करण्यात आले
- क्राईम टाईम्स टीम
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत कृषी विभाग खुलताबाद यांच्यामार्फत मौजे झरी व वडगाव तालुका खुलताबाद येथील शेतकऱ्यांना ज्वारी( फुले सुचित्रा वाण )बियाणे मोफत वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर , मंडळ कृषी अधिकारी व्ही एल नरवडे, कृषी पर्यवेक्षक आर के गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक कृष्णा नागरे यांनी सरपंच करण राजपूत उपसरपंच विठ्ठल साळुंखे ग्रामविकास अधिकारी बनसोड साहेब यांच्या उपस्थितीत मोजे झरी वडगाव येथील शेतकऱ्यांना ज्वारी (फुले सुचित्रा वाण )बियाण्याचे चार किलो ची बॅग वाटप करण्यात आले यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते