September 21, 2024

ऐकावे ते नवलच : खेती ज्योतिष डिव्हाईस चक्क शेतातील पिकांचे भविष्य सांगतो

0
Contact News Publisher

औरंगाबादेतील पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप

बदलत्या तापमानामुळे अनेकदा पीकांवर वेगवेगळे रोग येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र तुमच्या पीकावर कोणता रोग येणार आहे हे तुम्हाला आधीच कळाले तर कसं होईल. तुमचा विश्वास बसणार नाही, पण औरंगाबादच्या दोन सख्ख्या भावांनी पीकांचे भविष्य सांगणारे खेती ज्योतिष नावाचा डिव्हाईस तयार केला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देण्यासाठी आतापर्यंत अनेक उपक्रम बाजारात आली, मात्र औरंगाबादच्या समीर पितळे आणि प्रतीक पितळे या सख्ख्या बंधूंनी काही वेगळाच प्रयोग केला आहे. कारण त्यांनी तयार केलेल्या ‘खेती ज्योतिष’ डिव्हाईस चक्क शेतातील पिकांचे भविष्य सांगतो. शेताच्या मध्यभागी लावलेल्या या डिव्हाईसवर सुमारे 5 एकर जमिनीचा विविध 16 मुद्यांच्या आधारे डेटा जमा केला जातो. या डेटाच्या आधारावर पिकांवर कोणते रोग येऊ शकतो याचा अंदाज लावता येतो.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending