September 21, 2024

खाद्यतेलाचे टँकर उलटले अन् उडाली एकच झुंबड डबे अन् ; पातेले भरभरून नेले फुकटचे तेल

0
Contact News Publisher

औरंगाबादकडून बीडकडे गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणारा भरधाव वेगात जाणारा टँकर उलटून अपघात झाल्यानंतर परिसरातील

नागरिकांनी मदत न करता टँकरमधून वाहून जाणारे तेल घेऊन धूम
ठोकली. विशेष म्हणजे तेल घेऊन जाणाऱ्यांमध्ये महिला, मुले, मुलींसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. ही घटना मंगळवारी (ता. २२)धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ येथील बाह्यवळणावर घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, औरंगाबादकडून बीडकडे (क्र. जी. जे. १२. बी. एक्स-६४४२) हा टँकर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जात होता. सदर टँकर आडूळ येथील बाह्यवळणावर (बायपास) येताच समोर जाणाऱ्या वाहनचालकाने त्यास हुलकावणी दिली.यांत “त्या” वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन् सदर तेलाने भरलेले हे टँकर रस्त्याखाली जाऊन उलटले.

या घटनेची माहिती रजापूर, थापटी, आडूळ, देवगाव आदी आसपासच्या गावात समजताच टॅकरच्या दिशेने एकच तोबा गर्दी उसळली. प्रत्येकजण मिळेल ते भांडे, पाण्याच्या टाक्या, डबे, पाण्याचे जार, बादल्या तर कुणी पातेले घेऊन टॅकरच्या दिशेने धावले. अन् फुकटचे तेल मिळविण्यासाठी उपस्थितांची एकच झुंबड उडाली. जो तो आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र येथे दिसून आले एवढेच नव्हे तर उपस्थितांनी वाहून जाणारे मातीमिश्रित तेलही भरून नेले. तेल नेण्याऱ्याच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत अन् पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात खेचण्याचा प्रयत्न केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending