September 21, 2024

औरंगाबाद- न्यायचे होते एकीला, पण दारूच्या नशेत हात धरला दुसरीचा; त्याच्या एक चुकीने पोलीस लागली कामाला

0
Contact News Publisher

शाळेत येऊन एका अनोळखीने मुलीला नावाने हाक मारत ‘तुला घ्यायला पप्पांनी मला पाठविले आहे. चल, आपण घरी जाऊ, असे म्हणत नऊ वर्षांच्या मुलीचा हात धरून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औरंगाबाद सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती, तर पोलीस दलही कामाला लागले होते. पण हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

औरंगाबाद: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर; प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना; सुदैवाने..

औरंगाबादच्या सिडको परिसरातील जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका नऊवर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार 23 नोव्हेंबरला घडला होता. त्यानंतर पोलिसांनी अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यांची मुलगी आराध्या हिच्या अपहरणाचा एकाने प्रयत्न केला, अशी त्यांची तक्रार होती. पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शाळेच्या गेटवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आनंद भगत यांना शोधून आणले.

आनंद भगत यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, आनंद भगत यांचा मुलगाही जिगीष शाळेतच शिकत असल्याचे समोर आले. दरम्यान 23 नोव्हेंबरला जिगीषा शाळेच सहल गेली होती. सायंकाळी पाच वाजता सहल परतली. तेव्हा भगत आपल्या मुलाला घेण्यासाठी शाळेत गेले होते. विशेष म्हणजे भगत यांच्या घराशेजारी राहणारे भगवान खिल्लारे यांची मुलगी देखील त्याच शाळेत शिकत आहे. त्यामुळे शेजारी भगवान खिल्लारे यांनी त्यांच्या मुलीला देखील घेऊन येण्यास भगत यांना फोनवरून सांगितले.

औरंगाबाद : नव्या मीटरसाठी १६ हजारांची लाच; महावितरण कर्मचारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : वैजापूर शहरातील चारचाकीच्या शोरूमला भीषण आग

औरंगाबाद: शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह पालकांना मारहाण; धक्कादायक कारण समोर

औरंगाबाद-‘साहेब रोजची कटकट संपवली!’; पत्नीची हत्या करून पती थेट पोहचला पोलीस ठाण्यात

मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडणारा अटकेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending