September 21, 2024

रियल-स्टोरी – पैशांसाठी मी अशा माणसाशी लग्न केलं ज्यावर माझं काडीमात्रही प्रेम नव्हतं, पुढे त्याने जे केलं ते ठरलं अनपेक्षितच

0
Contact News Publisher

मी एक विवाहित स्त्री आहे. माझे लग्न अशा माणसाशी झाले आहे ज्याच्यावर माझे काडीमात्रही प्रेम नाही पण हेही तितकच खरं आहे की त्याच्यासोबत राहून माझ्या सर्व गरजा पूर्ण होत आहेत. याचे कारण असे की मी लहानपणापासूनच खूप गरीबी पाहिली होती, त्यामुळे मला नेहमीच चांगली लाइफस्टाइल हवी होती. आज शेवटी मला बालपणापासून हवे होते तसे आयुष्य मिळाले आहे आणि मी खूप आनंदी आहे.

प्रेमात मन बघावं आणि स्वभाव बघावं असं म्हणतात. पण आजच्या दुनियेत केवळ माणूस चांगलं असू चालत नाही तर त्याच्याकडे पैसा सुद्धा असावा लागतो हे या जगायचे वास्तव आहे. माझी सुद्धा या बाबत हीच मानसिकता आहे. मला सुद्धा एक उत्तम जोडीदार मिळावा, तो मनमिळाऊ असावा असे वाटायचे. पण एकाच व्यक्तीकडे सगळे असेल असे कधीच होऊ शकत नाही हे म्हणतात ते खरे आहे. काही मुले मानाने खूप चांगली असतात.

पण त्यांच्याकडे पैसा नसतो आणि ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या मनाचा काही भरवसा देता येत नाही. पण जसं मी वर म्हणाली तसं पैसा हे या जगात सर्वस्व आहे. आणि याच विचाराने मी अशा एका व्यक्तीशी लग्न केलं जो खूप पैसे वाला होता. माझ्या मनात त्याच्या बद्दल काहीच प्रेम नव्हतं. मला वाटलं माझं आयुष्य सुधारलं. मी सुखी झाली. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

मी लहानपणी खूप वाईट दिवस पाहिले आहेत. मी आणि माझी भावंडे आम्ही आमच्या आजीच्या घरी वाढलो. लहानपणीच आमचे आई वडील एका कार अपघातात आम्हाला सोडून गेले. तेव्हापासून आम्हाला आजीने वाढवलं. पण आई वडिलांशिवाय जगणे एवढे सोप्पे नसते. शिवाय कमावणारे पण कोणी नाही. यामुळे आम्हाला खूप हलाखीचे दिवस कधी कधी काढावे लागले. तेव्हापासूनच माझ्या मनात श्रीमंतीचे वेध लागले. पैसा असला की सगळे प्रश्न सुटतील हाच विचार माझ्या डोक्यात असायचा.

मला गरिबीत जगायचं नव्हतं. म्हणून मग वयात आल्यावर आणि जग समजू लागल्यावर मी कामाला जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी घरची जबाबदारी सुद्धा कधी ना कधी घ्यायची होतीच! मी घर सोडले आणि माझ्या शिक्षणाच्या जोरावर एक चांगली नोकरी मला मिळाली. आयुष्यात पुढे जाण्यासाठी टाकलेलं मी हे पहिलं पाउल होतं आणि माझी मागे वळून पाहण्याची इच्छा नव्हती. याच काळात माझी त्याच्याशी भेट झाली.

मी एका सेल्स कंपनीमध्ये कामाला होती आणि तुम्हाला तर माहित आहेच की सेल्स कंपनीमध्ये नुसत्या पार्ट्या सुरूच असतात. तर अशाच एका पार्टी मध्ये एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि माझ्यावर चक्क लाईन मारू लागला. तो मला पाहून स्माईल देत होता. मला न्याहाळत होता. त्यची ग्रे दाढी होती आणि त्यचा लुक अगदी स्मार्ट होता. त्याची आणि माझी पहिली भेट विचित्र असली तरी तो असा होता की ज्याच्याकडे पाहून कोणीही इम्प्रेस होईल. त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली आणि माझी खूप स्तुती केली. मी सुद्धा हळूहळू त्यच्याकडे ओढली जाऊं लागली.

ओळख करताना त्याने सांगितले की तो एक वकील आहे. बोलता बोलता त्याने हे देखील सांगितले की त्याचा घटस्फोट झाला आहे. तो आणि त्याची पत्नी खूप आधीच वेगळे झाले आहेत. माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता. तो वयाने देखील माझ्यापेक्षा खूप मोठा होता. पण त्यात असं काहीतरी होतं की मी त्याच्याकडे ओढली गेली आणि प्रेमात सुद्धा पडली. आम्ही मग डिनरला भेटलो. आमच्यात जवळीक वाढत गेली. तो एक वेळ सेटल व्यक्ती होता आणि त्यामुळे त्याच्याशी लग्न करायला सुद्धा मी तयार झाली. मला सुद्धा आयुष्यात हेच तर हवे होते.

 

मी माझ्या आजीशी त्याची भेट घालून दिली. तिने पहिला नकार दिला. पण माझ्या हट्टापुढे ती झुकली. पण नंतर तिच्या सुद्धा लक्षात आले की मी एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले आहे. त्याने आजीच्या आजारपणाचा सगळा खर्च उचलला. माझ्या भावंडांचे आयुष्य सुधारले. एकूण एका पैसेवाल्या व्यक्तीसोबत लग्न करून आम्ही सुखी झालो. पण मी सुखी होती का? तर नाही. कुठेतरी मला सतत वाटायचं की मी केवळ पैसा बघून त्याच्याशी लग्न केलं आहे. पुढे खरंच हे नातं टिकेल? याचे उत्तर मला आजही माहित नाही. आता आमचा संसार नीट सुरळीत आहे. पण हो माझे त्याच्यावर मनापासून प्रेम आजही नाही हे देखील खरे!

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending