September 21, 2024

गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी मोटरसायकल चोरायचा; टोळीचे कारनामे ऐकून पोलीसही चकित

0
Contact News Publisher

असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमासाठी माणूस कोणत्याही थरायला जायला तयार असतो. आता असंच काही औरंगाबादमध्ये पाहायला मिळाले. कारण गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी तिघांनी चक्क मोटारसायकल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा मोटरसायकल चोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान नारायण रामराव भंडारे (वय 21 वर्ष रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद), कृष्णा ज्ञानोबा होळकर (वय 24 वर्ष, रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद) आणि अर्जुन मधुकर वाकळे (वय 24 वर्ष, रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालय परिसर आणि वाळुज एमआयडीसी परिसरातून मोटरसायकल चोरी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

ही कारवाई औरंगाबाद शहर पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सफौ.विठठल जवखेडे, पोह. दत्तात्रय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, परभत म्हस्के, पो.अंमलदार संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिनगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending