September 21, 2024

हात उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्याने तरुणाचा खून

0
Contact News Publisher

तीन आरोपींना अटक:स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

  • सचिन कुशेर
  • (क्राईम रिपोर्टर)

देवगाव पोलीस ठाणे हद्दीतील औराळा येथील २१ वर्षीय असलेल्या सागर संतोष जैस्वाल या तरुणाचा खून झाला असून तो २१ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी देवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती परंतु सदर तरुणाचा तपास सुरू असतांना दि १ डिसेंबरबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पेडकवाडी येथील पोलीस पाटील आसाराम कलाल यांच्याकडून कन्नड पोलीसांना माहिती मिळाली की,पेडकवाडी ते कोळवाडी जाणाऱ्या रोडवरील पुलाच्या पाईप मध्ये एक पुरुष जातीचे प्रेत साडी व प्लास्टिक च्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेले असून,घटनेची माहिती मिळताच कन्नड चे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव तसेच गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे,कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी तात्यासाहेब भालेराव देवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अमोल मोरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली असता सदरील प्रेत हे सागर जैस्वालचे असल्याचे निर्देशनास आले मृत तरुणाचे चुलते विनोद जैस्वाल यांच्या फिर्यादिवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुन करून त्याचा पुरावा नष्ट करणे या बाबतच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना त्यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की सागर जैस्वालचा खून धनगरवाडी येथील काकासाहेब परसराम वाघचौरे(३४)पंढरीनाथ परसराम वाघचौरे(२८)आणि कविटखेडा येथील दिनेश उर्फ पप्पू संताराम साळुंके(२२)यांनी केला असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्या बाबत विचारपूस करून त्यांनी सांगितले की,मयत सागर जैस्वाल याच्याकडून पंढरीनाथ आणि पप्पू या दोघांनी हात उसने पैसे घेतलेले होते,सागर हा त्यांना नेहमी चार चौघात घेतलेल्या पैश्याची मागणी करून अपमान करत असल्याने त्याला पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलावून घेतले व त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी व दगड घालून त्यास जीवे ठार मारून त्याचे प्रेत पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये टाकून दिले,व त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन,हातातील अंगठ्या,कानातील बाळी काढून घेतली असल्याची आरोपींनी कबुली दिली असून पुढील तपासकमी त्यांना कन्नड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे,पोलीस उपनिरीक्षक संजय घुगे,वाल्मिक निकम,गणेश गांगवे,उमेश बकले,योगेश तरमाले,कन्नड ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक भालेराव,पोलीस उपनिरीक्षक सागरसिंग राजपूत,करवंदे,धनुरे यांनी केली आहे.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending