September 21, 2024

औरंगाबाद: नातीच्या लग्नाला गेलेल्या कंत्राटदाराचा बंगला भर दुपारी फोडला

0
Contact News Publisher

कंत्राटदाराचा बंगल्याच्या किचनची खिडकी टिकावाने तोडून आतमध्ये प्रवेश करीत साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना एन ३, सिडको भागातील अजयदीप कॉम्प्लेक्स जवळील बंगल्यात २९ नोव्हेंबर रोजी भर दुपारी घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस तपास करीत आहेत.बंगल्यात ते पत्नी, दोन विवाहित मुलांसह राहतात. त्यांच्या

नातीच्या लग्नासाठी सर्व कुटुंब कोल्हापूरला गेले होते. हीच संधी साधत एका चोरट्याने २९ नोव्हेंबरच्या भर दुपारी १ वाजता बंगल्याच्या कम्पाउंडवरून प्रवेश केला. सर्व दरवाजे बंद असल्यामुळे चोरट्याने पाठीमागच्या दरवाजाजवळच्या किचन रूम खिडकीची लोखंडी जाळी टिकावाने तोडून प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील खालच्या मजल्यावरील बेडरूम, देवघर, वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन लॅपटॉपसह चांदीचे दागिने घेऊन पोबाराकेला.

चव्हाण कुटुंब बुधवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात सगळीकडे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगर पोलिसांना कळवले. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विठ्ठल घोडके करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending