September 21, 2024

औरंगाबाद: डोक्यात फावडे मारून विभक्त पत्नीची पतीकडून हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल

0
Contact News Publisher

औरंगाबादच्या पैठण शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. बायोकाच्या डोक्यात फावड्याने मारहाण करून पत्नीला जागीच संपवून पती फरार झाला आहे. आज सकाळी सात वाजता ही घटना समोर आली असून, घटनास्थळी पैठण पोलीस दाखल झाले आहेत. त्यामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून, मंदा पुंडलिक पौळ असे मृत महिलेच नाव आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ हा वीट भट्टी कामगार होता. दरम्यान मंदा पौळ यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले होते. मात्र नेहमी दोघांमध्ये जमत नसल्याने तीन वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते. त्यामुळे मंदा या कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करायच्या. तर त्यांना तीन मुलं आहेत. पण विभक्त राहून देखील ज्ञानेश्वर हा मंदा यांच्यावर संशय घेऊन त्यांना सतत त्रास देत होता. एवढचं नाही तर अनेकदा वाद घालत होता.

पैठण शहरातील नेहुरू चौकात एका महिलेच्या डोक्यात फावडे टाकून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेला पैठण येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. तर पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध घेण्यात येत आहे.

औरंगाबाद: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर; प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना; सुदैवाने..

खाद्यतेलाचे टँकर उलटले अन् उडाली एकच झुंबड डबे अन् ; पातेले भरभरून नेले फुकटचे तेल

औरंगाबाद: शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह पालकांना मारहाण; धक्कादायक कारण समोर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending