September 21, 2024

औरंगाबाद: आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले!

0
Contact News Publisher

चारित्र्याच्या संशयावरुन रात्रभर बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केल्याची थरारक घटना बुधवारी मध्यरात्री घाणेगावात घडली. लक्ष्मीबाई संतोष जाधव (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती संतोष जाधव यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.घाणेगाव येथील संघर्षनगरात वास्तव्यास असणाऱ्या संतोष जाधव याने १७ वर्षापूर्वी लक्ष्मी हिच्या सोबत गंधर्व विवाह केला होता.

लक्ष्मीबाई हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी तर संतोष पासून आदर्श (१४) नावाचा एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार केल्यानंतर संतोष चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला सतत मारहाण करू लागला. दुसऱ्या लग्नानंतर संसार मोडू नये म्हणून लक्ष्मी अत्याचार सहन करीत होती. मात्र, संतोषच्या वर्तवणूकीत फरक पडत नव्हता.

दरम्यान, संशयाने पछाडलेल्या संतोषने दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीचे डोक्यावरचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तर बुधवारी संतोष मुलगा आदर्शसमोर लक्ष्मीला रात्रभर मारहाण केली. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संतोषने लोखंडी सळईने डोक्यात वार केल्याने लक्ष्मी गंभीर जखमी होऊन मृत झाली. लक्ष्मी मृत झाल्याची खात्री पटताच संतोषने आपल्या आई- वडिलांशी संपर्क करुन खून केल्याचे सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending