September 21, 2024

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

0
Contact News Publisher

पुढील चार ते पाच दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारतीय हवामान विभाग यांच्याकडील 9 डिसेंबर रोजीच्या हवामान विषयक पुर्वसुचना नुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. तर 9 डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किमान रब्बीतून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे.

औरंगाबाद: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर; प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना; सुदैवाने..

औरंगाबाद: शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह पालकांना मारहाण; धक्कादायक कारण समोर

भीषण अपघात: कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending