September 21, 2024

औरंगाबादेत सैराट!! साल्याने भररस्त्यात कुऱ्हाडीने केले मेव्हण्यावर वार

0
Contact News Publisher

दुचाकीवर आलेल्या साल्याने मेव्हण्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना ईसारवाडी फाट्यावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सैराट चित्रपटाप्रमाणेच ही घटना असल्याचे समोर येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील आरोपी व फिर्यादी हे एकमेकाचे नातेवाईक असल्याचे सांगतात. त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद होता. गुरुवारी तारीख 29 रोजी यातील मयत बापू खिल्लारे हा ईसारवाडी फाट्यावर चहा पीत होता. त्याच दरम्यान आरोपी दुचाकीवर आला. त्याने बापू खिल्लारे याला पाहताच कुऱ्हाड घेऊन पाठीमागे धावून सपासप कुर्हाडीने वार करून भर रस्त्यात त्याचा निर्घृण खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

विशेष म्हणजे याबाबत अशी ही माहिती मिळते की, आरोपीची बहीण फिर्यादीने पळवून आणली होती. या कारणावरून आरोपीच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने हे निर्घृण हत्याचे कृत्य केले असावे. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी मयत रक्ताच्या थारोळात पडलेला होता. शेजारीच त्याच्या चपलाही विखुरलेल्या होत्या. सैराट चित्रपटासारखाच हा थरार पहावयास मिळाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending