September 22, 2024

औरंगाबादेतील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर

0
Contact News Publisher

आपल्या वेगवेगळ्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने आज राज्यात संपाची हाक दिली आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये देखील आज शासकीय घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 300 ते 400 निवासी डॉक्टर आजपासून संपावर असून दरम्यान यावेळी घाटीत निवासी डॉक्टरांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली.

तर याचवेळी संपकरी निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्याचे फलक देखील झळकावले. या फलकावर वेगवेगळ्या घोषणा लिहलेल्या पाहायला मिळाल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending