September 22, 2024

ट्रॅक्टर ट्राँली, जुगाड मधून धोकादायक प्रकारे ऊस वाहतूक,

0
Contact News Publisher

सुलतानपुर-अतुल वेताळ

खुलताबाद तालुक्यातील साखर कारखाण्याचा गळीत हंगाम सुरु झाला असुन त्या साठी ऊस वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे,हि ऊस वाहतूक करताना धोकादायक पध्दतीने ट्रॅक्टर ट्राँली ,जुगाड मधून बेकायदेशीर पध्दतीने ऊस वाहतूक केली जात असून या वाहतुकीने वाहनधारकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे,परंतु या संबंधीत कारखाने ,पोलीसप्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी अशा धोकादायक पध्दतीने वाहतूक करणाऱ्या वाहतुकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, सध्या कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाला आहे खुलताबाद तालुक्यातील घृष्णेश्वर शुगर प्रा लि, चालू झाला आहे गळीतासाठी लागणारा ऊस तालुक्यातील परिसरातुन आणला जात आहे त्याच्या वाहतूकी साठी ट्रॅक्टर ट्राँली,जुगाड, याचा वापर करतात.यामुळे वाहतुकिस अडथळा,नागरिंंकाच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.


वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत आहे. अरुंद रस्त्यावर तर या ट्रॅक्टर ट्रॉल्यांपासून अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. एका ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉल्या जोडून आणि ट्रॅक्टर ट्रॉल्यांची लांबच लांब रांग करून रस्त्यावर अडथळे निर्माण केले जात आहेत. तसेच या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कुठल्याही प्रकारे वाहतूक नियमाप्रमाणे बनवलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा ट्रॉल्या वापरण्यास परवानगी आहे कि नाही, त्या कायदेशीर आहे ,कि ,नाही याची संबंधितानी चौकशी करायला हवी.

त्याच प्रमाणे ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक करणारे चालक ट्रॅक्टर मध्ये मोठे मोठे लाऊड स्पीकर्स लावून, डेसिबल चे नियम मोडत, मोठ्या आवाजात गाणे आणि संगीत लावत ऊस वाहतूक करताना जागोजागी दिसून येत आहेत. ट्रॅक्टरच्या इंजिनचा आवाज त्यात या लाऊड स्पीकरचा कर्ण कर्कश्य आवाज यामुळे या चालकाला आजूबाजूंनी येणारे आवाज, तसेच पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकण्यास मिळत नाही. त्यामुळे सुद्धा अपघाताचा धोका होऊ शकतो. मात्र याकडे सर्वच विभागांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.या लाऊड स्पीकरच्या आवाजांचा त्रास रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी अधिक होत असतो.

औरंगाबादेत सैराट!! साल्याने भररस्त्यात कुऱ्हाडीने केले मेव्हण्यावर वार


चालक रस्त्याच्या अगदी मध्यभागातून ट्रॅक्टर भरधाव पळविताना दिसतात
रस्त्यावरून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दिवसभर वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या अशा प्रकारामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांची फसगत होते.रात्रीच्या वेळी ट्रॉलीला मागील बाजूने लाईट नसतो. काही ना रिफ्लेक्टर असतात तर काही ना नसतात त्यामुळे मागील वाहनांना अंदाज घ्यावा कसा .
चालक मद्यप्राशन करून साउंड सिस्टीमचा आवाज वाढवून ट्रॅक्टर दामटतात. अशी नागरिकात चर्चा होते, त्यामुळे हे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर इतर वाहनचालकांच्या जिवावर उठल्याची स्थिती आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उसाची वाहतूक होते. रस्ता नागमोडी, उताराचा व चढावाचा असल्यास अपघाताचा धोका वाढतो.वेळीच यावर संबंधीतानी निर्बंध घालावे ,व होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी वाहन धारकां कडून होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending