September 21, 2024

लम्पिच्या मदतीसाठी पशुपालक प्रतीक्षेत

0
Contact News Publisher

सुलतानपुर,(अतुल वेताळ) खुलताबाद तालुक्यातीलओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकरी पशूंना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाने देखील हवालदिल झाला असून तालुक्यात जवळपास ५८पशुधन या रोगाने दगावले असले तरी पशुधनांची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मृत पशुधन पडताळणी पूर्ण होऊंनही शेतकऱ्यांवर भरपाईसाठी वाट पाहणेच नशिबी आले आहे.मागील काही महिन्यात पशुधनावर आलेल्या लम्पी रोगाने तालुक्यातील५८ जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या पालकांना ताबडतोब आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली खरी, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळावी यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाने घेरलेले असताना घरातले पशुधनही लम्पीने दगावल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
तालुक्यातील ५८ पशुधन लम्पी चर्मरोगाने दगावले आहेत. तालुक्यातील सातसे चोवीस जनावरे लम्पी आजारातून बरी झाली तर सध्या साठ जनावरे लम्पी ने बाधीत आहे.
जनावरांना जाहीर केलेली मदत दुभती गाय ३० हजार रुपये,भाकड गाय आणि बैल २५ हजार,वासरू १६ हजार लम्पी पासून पशुधनाला वाचवण्यासाठी आणि त्यांच्या उपचारावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. लम्पी आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या पालकांना तातडीने त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. अशी मागणी पशु पालकांनी केली आहे.

प्रतिक्रिया:-
तालुक्यात आता पर्यंत ५८ जनावरे लम्पि ने दगावले असून मदती साठी प्रस्ताव पुढे पाठवले आहे .

विष्णु खोडवे
पशुधन विस्तार अधिकारी

दोन महिने होऊन गेले लम्पी आजाराने माझी गाय दगावली अजुन पंर्यत मला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.

पशुपालक शेतकरी
सुलतानपू

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending