September 21, 2024

बाजार सावंगी येथे पालक मेळावा संपन्न

0
Contact News Publisher
  • बाजार सावंगी प्रतिनिधी-
  • रामेश्वर नलावडे
बाजार सावंगी-(ता:11) खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत परिसरातील अनेक गावांच्या 25 अंगणवाडी आशा कार्यकर्त्यांनी बालकांचा सर्वांगीण विकास संगोपनाचे ज्ञान कौशल्य वाढीसह सर्व कर्ष असा आरंभ नावाचा प्रकल्प महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या भव्य प्रांगणात स्टार सजवून मंगळवार (दि.10) आयोजित केला होता
शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा खेळ संवाद स्पर्श घरगुती खेळणे या माध्यमातून शारीरिक मानसिक भावनात्मक व बौद्धिक विकासाबाबत मेंदू सशक्त होण्यास पालकांना संदेश देण्यासाठी ह्या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते
यावेळी विकासात्मक बाबींचे खेळ खेळणी साहित्य घरगुती स्वरूपाचे त्यांची एकत्रित मांडणीतून व प्रात्यक्षकातून दाखवण्यात आले आरोग्य विषयक संदेश देण्यात आला आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी सुरेख स्टाईल उभारून सर्वांशी संवाद साधला व प्रबोधन केले
याप्रसंगी दिल्ली व महाराष्ट्र राज्याच्या सीनियर युनिसेफ कन्सल्ट डॉक्टर स्विमींग इराणी राजलक्ष्मी नायर शर्मिला मुखर्जी राजमाता जिजाऊ मिशनचे डॉक्टर गोपाळ पंडगे प्रोग्राम ऑफिसर करण पळसकर डॉक्टर ज्योती विभागीय प्रोग्राम अधिकारी ऐश्वर्या कोण कर औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले तालुका गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता बी व कटू डॉक्टर प्रणाली कोठेकर वर्धा पर्यवेक्षिका शोभा शिंदे यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एका प्रतिनिधीची उपस्थिती होती
प्रदर्शनी मेळावा पाहून मान्यवरांनी गौरव उद्गार काढले व आजचा कार्यक्रम राज्यात गौरवास्पद आहे
याप्रसंगी सरपंच आप्पाराव नलावडे उपसरपंच कारभारी नलावडे ग्राम विकास अधिकारी ए बी बनसोड प्रशालेचे मुख्याध्यापक हरिभाऊ दहिफळे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विमल दिवेकर माजी सरपंच वसंतराव नलावडे सदस्य पोपट काटकर कल्याण काटकर अरुण गायकवाड कृष्णा नलावडे प्रकाश नलावडे आदींनी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका शोभा शिंदे यांनी करून सूत्रसंचालन शिक्षक ज्ञानेश्वर सुरडकर यांनी केले
कन्हैया लाल जयस्वाल व प्रशालेचे सर्व शिक्षक आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या महिला यांनी परिश्रम घेत मेळावा यशस्वी केला

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending