September 22, 2024

बाजार सावंगी येथील श्री स्वरूप संप्रदाय तर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न

0
Contact News Publisher

बाजार सावंगी प्रतिनिधी-रामेश्वर नलावडे

बाजार सावंगी-(ता.15)खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील श्री स्वरूप संप्रदाय बाजार सावंगी सेवा केंद्रा तर्फे(दि.15) रविवार रोजी येथील छ. शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच या स्पर्धेमध्ये सांप्रदाय ट्रॉफी व टेनिस बॉल बॉक्स बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पोपट काटकर यांनी श्रीफळ फोडून केले
यामध्ये तीन टिमांनी सहभाग नोंदवला होता महाराणा सी सी झरी, सावंगी वॉरियस, बाजार सावंगी सीसी, अशा टिमांचा सहभाग होता यामध्ये सावंगी वॉरियसने 16 रणने महाराणा सी सी झरी यांना हरवले तसेच महाराणा सीसी झरी टीमने 138 धावा केल्या होत्या मात्र बाजार सावंगी सी सी या टीमला 50 रणांनी पराभव पत्करावा लागला व अंतिम स्पर्धेमध्ये सावंगी वॉरियसने महाराणा सी सी झरी या टीम समोर 121 धावांचे आव्हान ठेवले होते
मात्र महाराणा सी सी झरी या टीमला 70 रणावरच नमवावे लागले व सावंगी वॉरियस टिम विजेता ठरली त्यांना श्री स्वरूप संप्रदायाची ट्रॉफी तसेच टेनिस बॉल बॉक्स देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी रामेश्वर नलावडे, देविदास नलावडे, राजेंद्र स्वभावने,रमेश राऊत, ज्ञानेश्वर नलावडे,वैजिनाथ
सराटे,संतोष काटकर, राहुल नलावडे, अमोल लोखंडे, मंगेश काटकर, राहुल पगारे, देविदास सोनवणे .विलास नलावडे आदीं यावेळी उपस्थित होते

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending