September 22, 2024

अंधारीत दोन गटात धक्का बुकी ; परस्पराविरुध्द तक्रार दाखल

0
Contact News Publisher

अंधारी प्रतिनिधी

अंधारी ता सिल्लोड येथे रविवारी सकाळी ८ ते ८ :३० च्या सुमारास वेशीबाहेर मारोती मंदिरा जवळील हॉटेल जवळ परस्परात झालेल्या भांडणानंतर सिल्लोड पोलीस ठाण्यात परस्परा विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून एन सी स्वरूपाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे .
अंधारी येथील शिवाजी भाऊराव तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की २२ जानेवारी रविवार सकाळी ते वेशीबाहेर चहा हॉटेलवर असतांना आमचे उधारीचे पैसे का देत नाही असे म्हणून संतोष तायडे त्रिंबक संतोष तायडे नातू गौरव त्र्यंबक तायडे सौरभ त्रिंबक तायडे यां सर्वांनी मिळून शिवाजी तायडे यास लाथा बुक्यानी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली तर त्याच वेळी त्याच ठिकाणी घडलेल्या घटनेत संतुकराव तायडे यांनी सिल्लोड ग्रामिण पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की शिवाजी तायडे व विवेक तायडे यांना उधारीचे पैसे मागितले असता तुझी चक्की ६ महिन्यापासून बंद असल्याने तुझी उधारी देत नाही असे म्हणाले त्यांना समाजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी लाथा बुक्क्यानी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली अशा परस्परा विरुध्द एन सी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे . परस्परा विरुद्ध दाखल तक्रारीनंतर त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कार्यवाही करणार असल्याचे सिल्लोड ग्रामिण पोलीसांनी सांगितले

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending