September 21, 2024

EDची इन्ट्री-औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा!; तब्बल 19 जाणांवर गुन्हा दाखल

0
Contact News Publisher

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या टेंडर घोटाळ्याच्या तपासात आता ईडीने एन्ट्री केली आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.

या तीन कंपन्यांनी गैरमार्गाचा वापर करून टेंडर भरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस अशी या तीन कंपन्यांची नाव आहेत. या कंपन्यांचे मालक आणि जॉईंट व्हेंचर विरोधात फसवणुकीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहेप्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली आहेत. एकाच आयपी ॲड्रेस वरून निविदा दाखल करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येत आहे. या कंपनीने औरंगाबादसह राज्यातील किमान सहा ते सात शहरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे घेतली आहेत. कामे मिळवण्यासाठी पुण्यातील एका इमारतीचे प्रमाणपत्र लावण्यात आले आहे. याबाबत आता ईडी चौकशी करणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending