September 22, 2024

कृषी व जलसंधारण विभागाच्या समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

0
Contact News Publisher

औरंगाबाद, दि. 03 –शासनाने जिल्ह्याला दिलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने गावनिहाय केलेल्या आराखड्याप्रमाणे मंजूर जलसंधारणाची कामे कृषी व जलसंधारण विभागाने समन्वयाने पूर्ण करावे. तसेच जलयुक्त शिवार 2.0 या अभियानास गती द्यावी, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आढावा बैठकीत सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध कामांचा तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. यामध्ये शेततळे, शेतातील बांधबंदिस्ती, फळबाग लागवड आणि नालाबंडींग व इतर योजनेत करण्यात येणा-या जलसंधारणाच्या कामांबाबत संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या.
‘मिशन अमृत सरोवर‘अंतर्गत करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) मध्ये निवड करण्यात आलेल्या उर्वरीत गावांचा आराखडा अतिंम करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील विचार करुन सर्व विभागाने एकत्रित परिपूर्ण गाव आराखडा तयार करावा. जिल्ह्यात जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी व समन्वयाने अंमलबजावणी करावी. प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या विविध जलसंधारणाची काम पूर्ण करुन मार्च अखेर अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी पाण्डेंय यांनी कृषी आणि जलसंधारण विभागाच्या प्रमुखांना सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिल्लोड सहायक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, उपजिल्हाधिकारी संदीप पाटिल, कन्नड उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पैठण फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.आर देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी , वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी पी.एम शेलार उपस्थित होते. सर्व तालुका कृषी अधिकारी, तहसिलदार व जलसंधारण विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी देखील आढावा बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending